घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणे विद्यापीठ चौकातील डबल डेकर पुलाला ‘मा. अजित दादा पवार’ यांचे नाव देण्याची मागणी

पुणे विद्यापीठ चौकातील डबल डेकर पुलाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत मा. अजित दादा पवार यांचे नाव देण्यात यावे, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व क्रांतिवीर सेनेच्या वतीने पुणे महापालिका आयुक्त Nawal Kishor Ram यांना सादर करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अभिषेक संजय गोळे तसेच क्रांतिवीर सेनेचे संस्थापक मनोज आप्पा क्षीरसागर, चांगदेव भाऊ नेटके, धनंजय नाना जाधव, भोला माने, तेजस साबळे, विनायक साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पुणे शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन पायाभूत सुविधांना गती देणारे दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांनी जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरात अनेक विकासकामांना चालना मिळाली.पुणे विद्यापीठ चौकातील डबल डेकर पूल हा शहराच्या वाढत्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा आणि विकासाचे प्रतीक मानला जातो.

या पुलाला “मा. अजित दादा पवार डबल डेकर पूल” असे नामकरण केल्यास तो केवळ वाहतूक प्रकल्प न राहता त्यांच्या कार्याचा जिवंत स्मारक ठरेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.सदर नामकरणाचा निर्णय त्वरीत घ्यावा, अशी नम्र व भावनिक विनंती आयुक्तांकडे करण्यात आली आहे. आता महापालिका प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें