घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणे महानगरपालिकेतील २४ नगरसेवकांच्या विरोधात याचिका

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतील २४ नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी विविध आक्षेप उपस्थित करत न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.

त्यांतील ३ नगरसेवकांवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी याचिका प्रविष्ट केली आहे. महानगरपालिकेत १६५ नगरसेवक निवडून आले आहेत. सर्वाधिक भाजपचे ११९, राष्ट्रवादी काँग्रेसचे २७, राष्ट्रीय काँग्रेसचे १५, काँग्रेस शरद पवार गटाचे ३ आणि ठाकरे गटाचा १ असे संख्याबळ आहे.निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतरच्या १० दिवसांमध्ये याचिका प्रविष्ट करता येते. त्यानुसार जिल्हा लघुवाद न्यायालयाकडून २४ नगरसेवकांच्या विरोधात नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून देण्यात आली.

३ नगरसेवकांचे पद धोक्यात !

यापूर्वीच्या कायद्यात निवडून आलेल्या नगरसेवकाने अनधिकृत बांधकाम केल्यानंतर त्याचे पद रहित करण्याचे प्रावधान होते. सुधारित कायद्यानुसार संबंधित नगरसेवकाने निवडून येण्याआधीही अनधिकृत बांधकाम केले असेल, तरीही त्याचे पद रहित होऊ शकते. यानुसार ३ नगरसेवकांचे पद धोक्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें