घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यात स्पावर छापा; मॅनेजर व तरुणीची दुसऱ्या मजल्यावरून उडी, तरुणी गंभीर

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका स्पावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान मॅनेजर आणि एका तरुणीने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत दोघेही जखमी झाले असून तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हुसेन रेहमान शेख (३९) असे जखमी मॅनेजरचे नाव असून २७ वर्षीय तरुणीवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, विमानतळ परिसरात ‘द रूट’ नावाने स्पा सुरू होता. येथे गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलिस ठाण्याच्या पथकाने सायंकाळी छापा टाकला. पोलिस आल्याची चाहूल लागताच मॅनेजर आणि संबंधित तरुणीने दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारून पसार होण्याचा प्रयत्न केला.

मात्र उडी मारताना दोघेही जखमी झाले. घटनेनंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.या घटनेबाबत अधिक तपास विमानतळ पोलिसांकडून सुरू आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें