घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

राजेश भोज यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

येथील यशवंत शिक्षण संस्थेच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालयातील मराठी विभाग प्रमुख राजेश भोज यांना विद्यानिकेतन प्रतिष्ठान या सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

भोज हे मराठी विषयाचे अध्यापक, बालनाट्य लेखक व सर्वांगी प्रतिष्ठान वाईचे अध्यक्ष असून, अनेक सामाजिक संस्थांशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे विद्यानिकेतन संस्थेचे अध्यक्ष शशिकांत कोचळे यांनी सांगितले.

नगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक विजय ढेकाने, प्रसाद बनकर, सतीश बनवट व संतोष शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच पुरस्काराचे वितरण झाले. त्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून ३१ पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें