घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या २ दलालांना अटक

अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष आणि धाकदपटशा दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करून तिच्या वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून ठरावीक रक्कम स्वतःसाठी घेऊन उपजीविका करीत असल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक विभागाच्या कक्षाने केलेल्या कारवाईमधून समोर आला आहे.

शहरातील एका इमारतीच्या सदनिकेत हा वेश्याव्यवसाय सुरू होता. यावेळी एका पीडित अल्पवयीन मुलीची वेश्याव्यवसायातून सुटका करून दोघा दलालांना अटक करण्यात आली.

गुलनाज रफिक शेख (वय २५), इस्माईल इब्राहीम खान (वय ३२, रा. दोघे भाग्योदयनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. या प्रकरणी दोघांविरुद्ध पोलिस हवालदार तुषार भिवरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोंढवापोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक व प्रतिबंधक कायद्यासह बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें