घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पिंपरी-चिंचवडमध्ये परदेशी पार्सलसाठी टपाल खात्याची विशेष सुविधा

विदेशात पार्सल, कागदपत्रे पाठविण्यासाठी नागरिकांसाठी विशेष सुविधा टपाल खात्याने उपलब्ध करून दिली आहे. खासगी कुरिअर आणि इतर कंपन्यांपेक्षा विश्वासार्थ आणि माफक दरात ती सुरू करण्यात आली आहे.

पुणे शहर पूर्व विभाग अर्थात पिंपरी चिंचवडमधील सर्व टपाल कार्यालयात यासाठी पार्सल पॅकेजिंग युनिट स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे आरक्षासाठी स्वतंत्र गर्दीत थांबण्याची गरज नसणार.

चिंचवड येथील मुख्य टपाल कार्यालयामध्ये ग््रााहकांना एकाच छताखाली सर्व सेवा देण्याच्या उद्देशाने पार्सल पॅकेजिंग युनिट ची स्थापनादेखील करण्यात आलेली आहे. या युनिटअंतर्गत वेगवेगळ्या तीन क्षमतेचे बॉक्स नागरिकांसाठी उपलब्ध असून या बॉक्सला अगदी योग्य आणि पद्धतशीर पॅकिंग करण्यासाठीचे मशीनदेखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

तसेच, सर्वसामान्य नागरिकांसमवेत बुकिंग करण्यासाठी स्वतंत्र लाईन मध्ये थांबण्याची गरज नाही. त्यासाठी एका स्वतंत्र काउंटरचीदेखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. वैयक्तिक किंवा व्यावसायिक उद्देशाने परदेशात पाठवण्यात येणाऱ्या पार्सलसाठी हे एक खूप महत्त्वाचे पाऊल टपाल विभागाचे आहे.

विशेष म्हणजे सर्वसामन्यांना परवडेल असे दर असल्याने पार्सल किंवा कागदपत्रे पाठवण्यासाठी इतरत्र धावपळ करण्याची गरज नाही. टपाल विभागाने स्पीड पोस्ट, पार्सल या सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या. पिंपरी चिंचवड उपविभागाच्या अंतर्गत पीसीएनटी टपाल कार्यालय, चिंचवडगाव टपाल कार्यालय, भोसरी गाव, पिंपरी पीएफ टपाल, इन्फोटेक पार्क हिंजवडी, खडकी या पोस्ट ऑफिस मध्ये बुकिंग साठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे.

या सुविधेमध्ये आणखी अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आल्याचेदेखील पुणे शहर पूर्व विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर समीर महाजन यांनी सांगितले.

काळुराम पारखी, माहिती जनसंपर्क अधिकारी, पिंपरी चिंचवडग््रााहकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने तसेच, परदेशस्थित नागरिकांना सुलभ दराने पार्सल व कागदपत्रे पाठवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल आहे. स्पीड पोस्ट व पार्सलचे दरही इतर खासगी कुरिअर कंपन्यांपेक्षा परवडेल असे आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें