घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

क्रेनचा पट्टा तुटल्याने अपघात; सळई पडून महिलेचा मृत्यू

हडपसर येथील रामटेकडी ओैद्योगिक वसाहतीच्या आवारात लोखंडी जिन्याचे काम करताना क्रेनचा पट्टा तुटल्याने सळई डोक्यात पडून कामगार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी वानवडी पोलिसांनी क्रेन चालकासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वैशाली मारुती भोसले (वय ४७, रा. गोसावी वस्ती, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत भोसले यांचा मुलगा चेतन मारुती भोसले (वय २१) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील रामटेकडी ओैद्योगिक वसाहतीत एका खासगी कंपनीत वैशाली भोसले काम करत होत्या. कंपनीच्या आवारात मागील बाजूस लोखंडी जिना तयार करण्याचे काम १८ फेब्रुवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास सुरू होते.

सकाळी अकराच्या सुमारास वैशाली भोसले आणि सहकारी कंपनीच्या आवारातून पिण्याचे पाणी आणण्यासाठी निघाल्या होत्या. क्रेन चालक लोखंडी जिना तयार करण्यासाठी सळई उचलत होता. त्या वेळी अचानक क्रेनचा पट्टा तुटला. पट्टा तुटल्यानंतर क्रेनने उचलेली सळई वैशाली यांच्या डोक्यात पडली.

दुर्घटनेत वैशाली गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. क्रेन चालक, ठेकेदार यांनी पुरेशा सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे चौकशीत उघड झाले. त्यानंतर क्रेन चालक, ठेकेदार, तसेच संबधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें