पिंपळे सौदागर येथील एका व्यक्तीला स्टॉक मार्केटमध्ये जास्तीचा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून १४ लाख २९ हजार रुपयांना गंडवण्यात आले. ही घटना ९ ऑगस्ट २०२५ ते ४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडली.
याबाबत ३७ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करून एक ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले.
आरोपींनी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा होईल असे आमिष दाखवले. त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने वेळोवेळी एकूण १४ लाख २९ हजार ९० रुपये गुंतवले.
मात्र, गुंतवणूक केल्यानंतर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही आणि त्यांची मुद्दल रक्कमही परत मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.












