घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सरस्वती मंदिर संस्थेच्या ज्ञानसंस्कार स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन २०२६ उत्साहात संपन्न

सरस्वती मंदिर संस्थेव्दारा संचालित ज्ञानसंस्कार इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या वतीने आज दिनांक २६ /०२ /२६ रोजी स्कुल मधील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींन साठी सायन्स एक्झिब्युशन २०२६ चे आयोजन शाळेच्याच संस्था हाॅल मधे करण्यात आले होते.

इयत्ता ४ थी ते ९ वी तील अनेक विद्यार्थ्यांनी यामधे उत्स्फूर्तपणे आपापला सहभाग नोंदवला तसेच वेगवेगळ्या प्रकारचे सायन्स चे उत्तमोत्तम माॅडेल आपल्या घरात तयार करून ते सर्व पालक व शिक्षकांच्या समोर संस्था हाॅल मधे मांडण्यात आले होते.

यामधे शाळेतील सर्वच शिक्षकांची त्यांना मोलाची साथ लाभली होती. इयत्ता ९ वी मधे असलेल्या श्रेयस शेवाळे याने तयार केलेल्या डि एन ए माॅडेल चे सर्वांनीच विशेष कौतुक केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुजाता पाठक मॅडम यांचेही मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य सर्व विद्यार्थ्यांना वेळोवेळी मिळत होते.

आपल्या भाषणात त्यांनी सर्वच विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक करताना त्यांनी सर्व पालकांचेही या मधील सहभागासाठी आभार व्यक्त केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें