घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मांडवगण फराटा बंधाऱ्यातून पाणी गळती; शेतकऱ्यांची चिंता वाढली

मांडवगण फराटा (ता. शिरूर), दि. २८ : भीमा नदीवरील मांडवगण फराटा येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यावर १,०५० नवीन ढापे बसविण्यात आल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष पाहणीअंती बंधाऱ्यातून अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे आढळून आले आहे.

स्थानिक शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, काही ठिकाणी जुने आणि गंजलेले ढापे पूर्णपणे काढून टाकण्यात आले नाहीत. त्यावरच नवीन ढापे बसविण्यात आल्याने सांध्यांमधून पाणी झिरपत आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर साठवलेले पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असताना अशी गळती होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

शिरूर आणि दौंड तालुक्यातील अनेक गावांची शेती या बंधाऱ्यावर अवलंबून आहे. गळतीमुळे सिंचनासाठी उपलब्ध पाणीसाठा कमी होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तीन महिन्यांपूर्वी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

गणेश फराटे, वैभव फराटे, सतीश फराटे आणि संपत फराटे यांसह अनेक शेतकऱ्यांनी बंधाऱ्याची तातडीने तांत्रिक तपासणी करून जुने ढापे पूर्णतः बदलण्याची मागणी केली आहे.

“नवीन ढापे बसवले असले तरी गळती थांबलेली नाही. संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते,” असे राजेंद्र दरेकर (शेतकरी, मांडवगण फराटा) यांनी सांगितले.

दरम्यान, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके यांनी सांगितले की, बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येईल. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून गळती रोखण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जाईल.

स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें