घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पिण्याच्या पाण्याचा टंचाई प्रश्न; शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

वाल्हे (ता. पुरंदर) ग््राामपंचायत हद्दीतील पूर्वेकडील अंबाजीचीवाडी येथील तलाव कोरडा पडल्याने परिसरातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. अंबाजीचीवाडी, मुकदमवाडी, सुकलवाडी, गायकवाडीतील परिसरातील विहिरी व कूपनलिकांतील पाण्याची पातळी कमी होत आहे.

परिणामी नागरिकांसह जनावरांच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व त्यांच्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

अंबाजीचीवाडी येथील तलावाचे खोलीकरण व रुंदीकरण सन 1972 च्या दुष्काळामध्ये रोजगार हमी योजनेतून करण्यात आले होते. त्या दुष्काळी काळात स्थानिकांनी श्रमदान करून हा तलाव उभारला. खोलीकरणामुळे लाखो लिटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण झाली. ज्यामुळे पावसाळ्यात डोंगरातून वाहणारे पाणी येथे जमा होऊन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असे.

गतवर्षी मुसळधार पावसामुळे इतिहासात पहिल्यांदाच मार्च महिन्यात हा तलाव पूर्णक्षमतेने भरला व ओसंडून वाहिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले; मात्र, यावर्षी पावसाळ्यापूर्वीच तलाव कोरडा पडल्याने परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे.तुकाराम पवार, शेतकरी, अंबाजीचीवाडीसध्या विहिरी व कूपनलिकांमध्ये अगदी काहीच दिवसांचे पाणी शिल्लक असून, त्यानंतर नागरिकांना पाणीपुरवठ्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागणार आहे. यादरम्यान जनावरांना हिरवा चारा मिळणे अवघड झाले आहे. फेबुवारीतच पाणी संपल्याने टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार.

भाऊसाहेब पवार, शेतकरी, मुकदमवाडीविहिरींची पाणीपातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने जेमतेम काही दिवसच पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. सगळ्यात मोठा प्रश्न जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा असून, मागील महिन्यांपासून हिरवा चारा मिळवण्याची शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें