खंडाळा प्रतिनिधी : दशरथ राऊत
खंडाळा तालुक्यातील म्हावशी येथे क्रिकेटचा ऐतिहासिक सोहळा म्हावशी येथे प्रथमच भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून गावासाठी हा एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण ठरत आहे. ग्रामीण भागात क्रिकेटची वाढती लोकप्रियता लक्षात घेता या स्पर्धेमुळे गावातील क्रिकेटप्रेमींना एकत्र येण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
या क्रिकेट महोत्सवात स्थानिक तरुण खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याचे व्यासपीठ मिळणार असून गावातील क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून नियोजन, शिस्त आणि टीमवर्कच्या जोरावर हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या स्पर्धेमुळे गावात क्रीडासंस्कृतीला चालना मिळणार असून युवकांमध्ये क्रीडाभावना, एकजूट आणि आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. गावचे नाव तालुका व जिल्हा पातळीवर उजळविण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
म्हावशी ग्रामस्थ आणि क्रिकेटप्रेमींसाठी हा क्रिकेट महासंग्राम म्हणजे खऱ्या अर्थाने उत्सव ठरणार आहे.











