घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

नव्या शैक्षणिक धोरणाची यशस्वी पाऊलवाट व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, वाई येथे दिमाखदार ‘प्रोजेक्ट डे’ संपन्न

वाई प्रतिनिधी प्रशांत थोरवे


वाई : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, अनुभवाधारित शिक्षण आणि मूल्यसंस्कार यांना केंद्रस्थानी ठेवत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचलित व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, वाई येथे शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘प्रोजेक्ट डे’ उत्साहात व दिमाखात पार पडला. मराठी राजभाषा गौरव दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेला हा ज्ञान, संस्कार आणि सृजनशीलतेचा सोहळा ठरला.
इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी “विविधतेत एकता” हा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावी प्रात्यक्षिकांद्वारे सादर केला .
मराठी महिन्यांची ओळख व त्या-त्या महिन्यांनुसार साजरे होणारे सण यांची माहिती त्यांनी आत्मविश्वासाने मांडली.
लहान वयातही स्पष्ट उच्चार, अभ्यासपूर्ण मांडणी आणि सादरीकरणातील निपुणता यामुळे उपस्थित पालक व पाहुणे भारावून गेले.
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी युनेस्कोप्राप्त किल्ल्यांची माहिती अत्यंत ओजस्वी शब्दांत उलगडली. प्रत्येक किल्ल्याची ऐतिहासिक गाथा जिवंत करताना त्यांनी स्वराज्याच्या पराक्रमाची साक्ष देणारा इतिहास समोर उभा केला .
विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय कार्याचा संदर्भ देत स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा जागवली.
इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले विज्ञान विषयक लघु प्रयोग हे या उपक्रमाचे आणखी एक आकर्षण ठरले.
वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशक्ती आणि संशोधनवृत्ती यांचे उत्कृष्ट दर्शन घडवत विद्यार्थ्यांनी विविध संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगातून स्पष्ट केल्या. पाहुण्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अभ्यासपूर्ण व नेमकी उत्तरे देत आपली तयारी सिद्ध केली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, पंचायत समिती वाई माननीय श्री. शरद गायकवाड व श्री. राहुल हजारे उपस्थित होते. शाळा समिती सदस्या माननीय सौ. घैसास मॅडम यांचीही उपस्थिती लाभली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ. विद्या राव यांच्या कुशल नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.

आपल्या मनोगतात मान्यवरांनी शाळेच्या उपक्रमशीलतेचे आणि विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे मनःपूर्वक कौतुक केले. त्यांनी उपस्थित मातांना संबोधित करत सांगितले की, ज्या प्रकारे राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर संस्कारांची भक्कम पायाभरणी केली, तसेच मूल्याधिष्ठित शिक्षण आजच्या पिढीला देणे ही काळाची गरज आहे. सेवा, समर्पण आणि प्रामाणिकपणा या गुणांची शिदोरी घेऊन विद्यार्थ्यांनी आदर्श नागरिक बनावे, असे प्रेरणादायी आवाहनही त्यांनी केले.
ज्ञानार्जनासोबत संस्कारांची जोड देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची वाटचाल दृढ करणारा हा ‘प्रोजेक्ट डे’ शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची ठळक साक्ष ठरला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें