घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

शेपूट अन् पाय पकडून हवेत फिरवलं, नंतर खाली आपटलं

पिंपरी-चिंचवड शहरात मानवतेला काळिमा फासणारी आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. एका भटक्या कुत्र्याला काही माथेफिरूंनी भर रस्त्यात निर्दयीपणे मारहाण करत हवेत फिरवून जमिनीवर आपटलं.

इतकंच नाही, तर त्याला चारचाकी वाहनाने उडवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील तुकाराम नगर पोलीस स्टेशन हद्दीत 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. रात्री साधारण एक वाजण्याच्या सुमारास आरोपी स्वप्निल सखाराम सावंत याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका भटक्या कुत्र्याला पाठीमागून हातात पकडलं.

सीसीटीव्ही फुटेज समोरप्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजनुसार, आरोपीने त्या निष्पाप प्राण्याला हवेत गोल फिरवत जोरात जमिनीवर आपटलं. या अमानुष मारहाणीत कुत्रा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतरही आरोपी आणि त्याच्या सोबत असलेल्या सहा ते सात जणांनी भर रस्त्यात आरडाओरडा करत नाच केला आणि धिंगाणा घातला. धक्कादायक बाब म्हणजे, त्यानंतर आरोपींकडे असलेल्या चारचाकी वाहनाने भरधाव वेगाने जाऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जखमी कुत्र्याला उडवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. सुदैवाने कुत्रा थोडक्यात बचावला असल्याची माहिती मिळते.

नागरिकांमध्ये संतापाची लाट

ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी एका तरुणाने धाडस दाखवत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर संत तुकाराम नगर पोलीस ठाणे येथे आरोपी स्वप्निल सखाराम सावंत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें