घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

उंड्रीतील रहिवासी संकुलांना आरएमसी प्लांटचा विळखा

शहराच्या उपनगरांमध्ये अनियंत्रितपणे सुरू असलेल्या विकासकामांचा फटका आता रहिवासी क्षेत्रातील नागरिकांना बसू लागला आहे. उंड्री परिसरातील मयुरी इन्फिनिटी सोसायटीच्या मागील रस्त्यावर सुरू असलेल्या आरएमसी प्लांटमुळे स्थानिक नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

दिवसभर चालणारी जड वाहतूक आणि उडणारी सिमेंटची धूळ यामुळे हा परिसर जणू ‘डेथ ट्रॅप’ बनला असल्याची भावना रहिवासी व्यक्त करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज-मंतरवाडी बायपासवरील एका स्कूलच्या समोर असलेल्या या मार्गावर आरएमसी ट्रक्सची सतत वर्दळ असते. या ट्रक्समधून सांडणारे सिमेंट आणि उडणारी धूळ यामुळे रस्त्यावर थरावर थर साचले आहेत.

यामुळे रस्ता अत्यंत घसरडा झाला असून दुचाकी स्लिप होऊन अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पाऊस असो वा नसो, सिमेंटच्या राखेमुळे या रस्त्यावरून चालणेही दुरापास्त झाले आहे.सर्वात चिंतेची बाब म्हणजे या भागात नामांकित शाळा असून शाळेच्या बसेसना या अवजड वाहतुकीमुळे मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो.

आरएमसी ट्रक्सच्या बेशिस्त रांगांमुळे शालेय बसेसना मार्ग काढणे कठीण होते, ज्यामुळे लहान मुलांचा जीव धोक्यात येत आहे. “हा रहिवासी परिसर आहे की औद्योगिक वसाहत?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

या प्रदूषणकारी प्लांटमुळे हवेची गुणवत्ता खालावली असून ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना श्वसनाचे विकार जडण्याची भीती निर्माण झाली आहे. मयुरी इन्फिनिटी सोसायटी आणि परिसरातील नागरिकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

“आम्हाला स्वच्छ हवा आणि सुरक्षित रस्ते हवे आहेत,” अशी मागणी करत रहिवाशांनी या प्लांटच्या अधिकृततेची तात्काळ चौकशी करण्याची मागणी महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे. नियमभंग आढळल्यास हा प्लांट तातडीने बंद करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें