घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

संरक्षण विभागाची सुरक्षा भिंत कोसळली

सांगवी फाटा येथील बाबूरावजी घोलप महाविद्यालय बस थांब्याशेजारील संरक्षण विभागाची जुनी सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना घडली. भिंतीचा मोठा भाग थेट पदपथ व रस्त्यावर पडल्याने पादचारी तसेच वाहनचालकांसाठी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.दोन दिवसांपूर्वी संरक्षण विभागाच्या जागेभोवती उभारण्यात आलेल्या सुरक्षा भिंतीचा काही भाग अचानक थेट पदपथावर पसरला. या मार्गावर शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि स्थानिक नागरिकांची दिवसभर मोठी वर्दळ असते. त्यातच बस थांब्यालगतच ही घटना घडल्याने प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे.

या ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग तसेच औंधकडे जाणारा मार्ग आणि रक्षक चौकाकडून येणारा मार्ग अशा चार दिशांमधून वाहतूक एकत्र येत असल्याने वाहतूक आधीच मोठ्या प्रमाणात असते.संरक्षण दलाच्या सुरक्षा भिंतीचा काही भाग पदपथावर पडला आहे.

संरक्षण विभागाशी संपर्क साधून तुटलेल्या भिंतीमुळे पदपथावर पडलेला राडारोडा तातडीने उचलून घेण्यास सांगितले जाईल.स्थापत्य विभाग, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयसांगवी फाट्याकडे जाण्यासाठी नागरिकांना याच मार्गाने जावे लागते. मात्र, पदपथ व रस्त्यावर पडलेल्या भिंतीच्या राडारोडा आणि काटेरी तारेमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्वरीत राडारोडा हटवून भिंतीची दुरुस्ती करावी.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें