घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणेकरांना उकाड्याचा तडाखा

गेल्या काही दिवसांपासून शहरातील कमाल आणि किमान तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. परिणामी पुणेकरांना उन्हाचा चटका जाणवत असून उकाड्यातदेखील वाढ झाली आहे.

मात्र पुढील तीन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.शहर आणि परिसरात शनिवारी (ता. ७) कमाल आणि किमान तापमान स्थिर होते. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे दुपारी घराबाहेर पडताना नागरिकांना कडक उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. पुढील तीन दिवस हवामान स्थिर राहणार असल्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर पुन्हा कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

पुणे आणि परिसरात रविवारी (ता. ८) किमान आणि कमाल तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें