महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची सहविचार सभा आज नियोजित वेळेनुसार ग्राम विकास मंडळाचे चैतन्य विद्यालय,ओतूर ता.जुन्नर,जिल्हा पुणे या ठिकाणी राज्य टीडीएफ अध्यक्ष आदरणीय जी.के. थोरात सर यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे कार्यवाह आदरणीय के. एस. ढोमसे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली.
सहविचार सभेची सुरुवात राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार तसेच शिक्षण क्षेत्रातील निधन पावलेल्या ज्ञात अज्ञात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या श्रद्धांजलीनी करण्यात आली. सुरुवातीलाच उपस्थित सर्व मान्यवरांचे ग्रामविकास शिक्षण संस्थेच्या वतीने पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. पंकज घोलप सर यांनी स्वागत करून मान्यवरांच्या हस्ते सर्वांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच महिला दिनाचे औचित्य साधून महिला प्रतिनिधी सौ. ज्योती नेटवदे मॅडम व सौ. मंगला चव्हाण मॅडम यांचा सन्मान करण्यात आला.राज्य टीडीएफचे कार्यवाह आदरणीय के.एस.ढोमसे सर यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून तो सर्व पदाधिकाऱ्यांच्या संमतीने सहमत करण्यात आला.या सहविचार सभेमध्ये विषय पत्रिकेवरील विषयानुसार मुद्देसूद चर्चा करण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने पुणे नाशिक मुंबई व कोकण विभागातील जिल्हा तसेच विभाग स्तरावरील निवडणुका घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नाशिक विभागाचे अध्यक्ष श्री. संजय पवार सर यांनी यांनी आपल्या विभागाची परिस्थिती विशद करून राज्य संघटनेच्या योग्य त्या मार्गदर्शनाखाली लवकरच विभागाची फेररचना करण्यात येईल असे सांगितले.
पुणे विभागाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजी कामथे सर यांनी विभागाची परिस्थिती विशद करून निवडणुका बाकी आहेत त्या निवडणुका लवकरच विभागावर जिल्हास्तरीय बैठका घेऊन असे सांगितले.या वेळेस राज्य टीडीएफ चे वार्षिक अधिवेशन पुणे विभागाने घ्यावे निश्चित करण्यात आले याला सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला.
त्याचप्रमाणे या विचार सभेमध्ये खालील मुद्द्यावर व्यवस्थित चर्चा करण्यात आली 1) 2024 च्या संच मान्यतेच्या वर संघटनेच्या वतीने योग्य वेळी योग्य ते पाऊल उचलले जाईल याबाबत राज्य कार्यवाह के.एस .ढोमसे सर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.2) शिक्षक भरती,पवित्र पोर्टल याबाबत लवकरच शिक्षण मंत्री महोदय यांच्याबरोबर टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करणे.3) पुणे, अमरावती व नागपूर विभागातील शिक्षक व पदवीधर मतदार संघातील इच्छुक उमेदवारां कडून त्यांच्या उमेदवारीबाबत चाचपणी करणे व योग्य त्या उमेदवाराला संघटनेच्या पाठिंबा बाबत निर्णय घेणे.
ऐन वेळेच्या विषयांमध्ये उपाध्यक्ष नानासाहेब फुंदे यांनी येणाऱ्या काळामध्ये संघटनेचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा त्याचप्रमाणे आत्म सन्मान व स्वाभिमानाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वागले पाहिजे असे मत व्यक्त केले. एकूणच ही सहविचार सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. सर्वांनी आपापली मते मनमोकळेपणाने मांडून यावर चर्चा घडवून आणली.
यावेळेस राज्याचे अध्यक्ष जी.के. थोरात सर यांनी येणाऱ्या काळामध्ये संघटनेचा प्रचार प्रसार तसेच संघटनेची बांधणी प्रत्येक विभागात चांगली करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले व प्रत्येक विभाग अध्यक्षांना अधिकार घेण्याचे स्वातंत्र्य असून राज्य संघटनेचा त्यांना सदैव पाठिंबा राहील असे जाहीर केले.
या सहविचार सभेसाठी पुणे विभागातून पुणे विभागाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे सर, सचिव मुरलीधर मांजरे सर, राज्य कार्यकारणी सदस्य श्री.मुकुंद साळुंखे सर, पुणे शहराध्यक्ष संतोष थोरात सर, श्री. टोपे सर नाशिक विभागातून राज्य उपाध्यक्ष आर. एच.बाविस्कर सर, विभागाचे अध्यक्ष संजय पवार सर ,मनोज शिरसाठ सर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई विभागातून उपाध्यक्ष नानासाहेब फुंदे सर, मुंबई विभाग अध्यक्ष सतीश इनामदार सर, सहखजिनदार सौ. ज्योती नेटवदे मॅडम व सौ. मंगला चव्हाण मॅडम उपस्थित होत्या. या सहविचार सभेचे आयोजन नियोजन राज्य प्रतिनिधी प्रदीप गाढवे सर, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. पंकज घोलप सर,जुन्नर तालुकाध्यक्ष संतोष सहाने सर सेवानिवृत्त टीडीएफ अध्यक्ष श्री.अशोक घोलप सर, श्री. कांबळे सर यांनी राज्य टीडीएफच्या मार्गदर्शन नुसार केले होते.
शेवटी सर्व मान्यवरांचे आभार ओतूर ग्रामविकास शिक्षण संस्थेचे सचिव व राज्य प्रतिनिधी प्रदीप गाढवे सर यांनी मानले. राज्य उपाध्यक्ष आदरणीय नरसू पाटील सर व त्यांच्या सहकारी या सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी कोल्हापूर वरून सकाळी निघाले होते परंतु काही अपरिहार्य कारणामुळे सभेला वेळेत पोहोचू शकले नाही परंतु मोबाईल वरून त्यांनी संपर्क साधून सभेचा आढावा घेतला.शेवटी जुन्नरच्या सर्व टीमच्या वतीने सर्व मान्यवरांना अतिशय चविष्ट व रुचकर अशा भोजनाची मेजवानी देण्यात आली.टीडीएफच्या राज्य कार्यकारणीची सहविचार सभा उत्साहात संपन्न.
महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची सहविचार सभा आज नियोजित वेळेनुसार ग्राम विकास मंडळाचे चैतन्य विद्यालय,ओतूर ता.जुन्नर,जिल्हा पुणे या ठिकाणी राज्य टीडीएफ अध्यक्ष आदरणीय जी.के. थोरात सर यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे कार्यवाह आदरणीय के. एस. ढोमसे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. सहविचार सभेची सुरुवात राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार तसेच शिक्षण क्षेत्रातील निधन पावलेल्या ज्ञात अज्ञात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या श्रद्धांजलीनी करण्यात आली.
सुरुवातीलाच उपस्थित सर्व मान्यवरांचे ग्रामविकास शिक्षण संस्थेच्या वतीने पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. पंकज घोलप सर यांनी स्वागत करून मान्यवरांच्या हस्ते सर्वांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच महिला दिनाचे औचित्य साधून महिला प्रतिनिधी सौ. ज्योती नेटवदे मॅडम व सौ. मंगला चव्हाण मॅडम यांचा सन्मान करण्यात आला.राज्य टीडीएफचे कार्यवाह आदरणीय के.एस.ढोमसे सर यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून तो सर्व पदाधिकाऱ्यांच्या संमतीने सहमत करण्यात आला.या सहविचार सभेमध्ये विषय पत्रिकेवरील विषयानुसार मुद्देसूद चर्चा करण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने पुणे नाशिक मुंबई व कोकण विभागातील जिल्हा तसेच विभाग स्तरावरील निवडणुका घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नाशिक विभागाचे अध्यक्ष श्री. संजय पवार सर यांनी यांनी आपल्या विभागाची परिस्थिती विशद करून राज्य संघटनेच्या योग्य त्या मार्गदर्शनाखाली लवकरच विभागाची फेररचना करण्यात येईल असे सांगितले.पुणे विभागाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजी कामथे सर यांनी विभागाची परिस्थिती विशद करून निवडणुका बाकी आहेत त्या निवडणुका लवकरच विभागावर जिल्हास्तरीय बैठका घेऊन असे सांगितले.या वेळेस राज्य टीडीएफ चे वार्षिक अधिवेशन पुणे विभागाने घ्यावे निश्चित करण्यात आले याला सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला.
त्याचप्रमाणे या विचार सभेमध्ये खालील मुद्द्यावर व्यवस्थित चर्चा करण्यात आली
1) 2024 च्या संच मान्यतेच्या वर संघटनेच्या वतीने योग्य वेळी योग्य ते पाऊल उचलले जाईल याबाबत राज्य कार्यवाह के.एस .ढोमसे सर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
2) शिक्षक भरती,पवित्र पोर्टल याबाबत लवकरच शिक्षण मंत्री महोदय यांच्याबरोबर टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करणे.
3) पुणे, अमरावती व नागपूर विभागातील शिक्षक व पदवीधर मतदार संघातील इच्छुक उमेदवारां कडून त्यांच्या उमेदवारीबाबत चाचपणी करणे व योग्य त्या उमेदवाराला संघटनेच्या पाठिंबा बाबत निर्णय घेणे.ऐन वेळेच्या विषयांमध्ये उपाध्यक्ष नानासाहेब फुंदे यांनी येणाऱ्या काळामध्ये संघटनेचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा त्याचप्रमाणे आत्म सन्मान व स्वाभिमानाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वागले पाहिजे असे मत व्यक्त केले.
एकूणच ही सहविचार सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. सर्वांनी आपापली मते मनमोकळेपणाने मांडून यावर चर्चा घडवून आणली. यावेळेस राज्याचे अध्यक्ष जी.के. थोरात सर यांनी येणाऱ्या काळामध्ये संघटनेचा प्रचार प्रसार तसेच संघटनेची बांधणी प्रत्येक विभागात चांगली करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले व प्रत्येक विभाग अध्यक्षांना अधिकार घेण्याचे स्वातंत्र्य असून राज्य संघटनेचा त्यांना सदैव पाठिंबा राहील असे जाहीर केले.
या सहविचार सभेसाठी पुणे विभागातून पुणे विभागाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे सर, सचिव मुरलीधर मांजरे सर, राज्य कार्यकारणी सदस्य श्री.मुकुंद साळुंखे सर, पुणे शहराध्यक्ष संतोष थोरात सर, श्री. टोपे सर नाशिक विभागातून राज्य उपाध्यक्ष आर. एच.बाविस्कर सर, विभागाचे अध्यक्ष संजय पवार सर ,मनोज शिरसाठ सर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई विभागातून उपाध्यक्ष नानासाहेब फुंदे सर, मुंबई विभाग अध्यक्ष सतीश इनामदार सर, सहखजिनदार सौ. ज्योती नेटवदे मॅडम व सौ. मंगला चव्हाण मॅडम उपस्थित होत्या. या सहविचार सभेचे आयोजन नियोजन राज्य प्रतिनिधी प्रदीप गाढवे सर, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. पंकज घोलप सर,जुन्नर तालुकाध्यक्ष संतोष सहाने सर सेवानिवृत्त टीडीएफ अध्यक्ष श्री.अशोक घोलप सर, श्री. कांबळे सर यांनी राज्य टीडीएफच्या मार्गदर्शन नुसार केले होते.
शेवटी सर्व मान्यवरांचे आभार ओतूर ग्रामविकास शिक्षण संस्थेचे सचिव व राज्य प्रतिनिधी प्रदीप गाढवे सर यांनी मानले. राज्य उपाध्यक्ष आदरणीय नरसू पाटील सर व त्यांच्या सहकारी या सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी कोल्हापूर वरून सकाळी निघाले होते परंतु काही अपरिहार्य कारणामुळे सभेला वेळेत पोहोचू शकले नाही परंतु मोबाईल वरून त्यांनी संपर्क साधून सभेचा आढावा घेतला.शेवटी जुन्नरच्या सर्व टीमच्या वतीने सर्व मान्यवरांना अतिशय चविष्ट व रुचकर अशा भोजनाची मेजवानी देण्यात आली.












