घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

‘एचपीव्‍ही’लसीकरणास महापालिकेच्‍या दवाखान्‍यांत सुरवात

गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षण देणाऱ्या ह्यूमन पॅपिलोमा व्‍हायरस’ (एचपीव्ही) विषाणू प्रतिबंधात्‍मक लसीकरणाला शहरात सोमवारपासून प्रारंभ झाला. बोपोडी येथील द्रौपदाबाई खेडेकर दवाखाना, लायगुडे दवाखाना, शिवाजीनगर येथील दळवी दवाखाना तसेच कमला नेहरू रुग्णालय येथे पहिल्‍या दिवशी १४ ते १५ वयोगटातील २५ मुलींना ही लस देण्‍यात आली.

दरम्‍यान, महापालिकेच्‍या २१ प्रसूतिगृहांमध्ये ही लस उपलब्‍ध आहे.गर्भाशयमुखाच्‍या कर्करोगापासून आयुष्‍यभरासाठी रक्षण करणारी ही ‘गार्डासिल’ लस आहे. त्‍याचा एकच डोस पुरेसा आहे. ती सध्‍या शाळांमध्ये जाऊन दिली जाणार नसून केवळ महापालिकेच्‍या दवाखान्यामध्येच उपलब्ध असेल. ही लस देण्‍यासाठी मुलींची ‘यु-विन’ या पोर्टलवर ऑनलाइन स्वयं-नोंदणी करणे आवश्यक आहे.

या पोर्टलवर लसीकरण केंद्रांची माहिती उपलब्ध असून त्याद्वारे लस घेता येणार आहे. लसीकरणानंतर या मुलींना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणाचा टक्‍का वाढवण्‍यासाठी स्थानिक नगरसेवकांचीही मदत घेतली जाणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली.लसीकरणाबाबत गैरसमजांचे खंडणया लशीबाबत गैरसमज पसरवणारे संदेश काहींनी समाजमाध्‍यमांवर टाकल्‍याने त्‍यांंना आरोग्‍य विभागाने नोटीस पाठवली आहे.

ही लस गेल्‍या १५ वर्षांपासून देण्‍यात येत असून ती सुरक्षित असल्‍याचे आरोग्‍य विभागाने म्‍हटले आहे.काय आहे गर्भाशयमुख कर्करोगस्‍तन कर्करोगापाठोपाठ महिलांमध्‍ये गर्भाशयमुख कर्करोग होण्‍याचे प्रमाण दुसऱ्या क्रमांकावर आहे.’एचपीव्‍ही’ संसर्गाची लक्षणे सुरवातीला दिसत नाहीत. या कर्करोगाच्‍या पुढील टप्‍प्‍यात रक्‍तस्‍त्राव, दुर्गंधीयुक्‍त स्‍त्राव, ओटीपोटात वेदना ही लक्षणे दिसतात.

लसीकरण केल्‍यावर त्‍यापासून ९३ ते १०० टक्‍क्‍यांपर्यंंत संरक्षण मिळते.’ही लस सुरक्षित व प्रभावी आहे. ती मुलींना दिल्‍याने त्‍यांच्‍यामध्‍ये ‘एचपीव्‍ही’ विषाणूंच्‍या विरोधात प्रतिपिंड (ॲंटीबॉडी) तयार होतात व ती आयुष्‍यभरासाठी टिकतात. त्‍यासाठी १४ ते १५ वयोगटातील मुलींचे लसीकरण करून घ्यावे.

महापालिकेच्‍या हद्दीतील ३५ हजार मुलींचे लसीकरण करण्‍यात येणार असून त्‍यापैकी १९ हजार डोस मिळाले आहेत. टप्‍प्‍याटप्‍प्‍याने पुढील डोस मिळतील.

एचपीव्ही लसीकरणाची वैशिष्ट्‌ये

— ९ ते १५ वर्षे वयोगटातील मुली पात्र.

– ही लस ‘एचपीव्‍ही’ चा विषाणू प्रकार ६, ११, १६ आणि १८ पासून संरक्षण देते.

– लस ०.५ मिली प्रमाणात स्नायूमध्ये (इंट्रामस्‍क्‍यूलर) दिली जाते.

– आधी लसीकरण केल्‍यास पुन्‍हा देण्‍याची गरज नाही

– मासिक पाळी सुरू असतानाही ही लस घेणे सुरक्षित असून पाळीवर परिणाम होत नाही.

– लसीकरणामुळे प्रजनन क्षमता किंवा भविष्यातील गर्भधारणेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.

– व्यापक लसीकरणामुळे भविष्यात गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें