घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यात भयंकर अपघात, बसने दुचाकीला चिरडलं; तरुणाचा जागीच मृत्यू

पुण्यामध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.भरधाव बसने दुचाकीला चिरडलं. पुणे- नगर महामार्गावर शिक्रापूर येथे ही घटना घडली. या अपघाताचा थरार रस्त्यालगत असलेल्या दुकानाच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघाताचा हा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याजवळच्या शिक्रापूर येथे पुणे- नगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात महेश धोंडीराम भगत (४४ वर्षे) यांचा मृत्यू झाला. महेश दुचाकीवरून जात होते. महामार्गावर वळण घेत असताना भरधाव बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातामध्ये दुचाकी दूरवर फेकली गेली. अंगावरून बस गेल्यामुळे महेश यांचा जागीच मृत्यू झाला.

दुचाकीला धडक दिल्यानंतर बस चालकाने न थांबता बस घेऊन फरार झाला.अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या महेशला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. महेश भगत यांच्या मृत्यूमुळे शिक्रापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची बातमी कळताच शिक्रापूर येथील मित्र परिवारानी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.

दरम्यान, पुणे- अहिल्यानगर महामार्गावर शिक्रापुर कोंढापुरी या ठिकाणी आणखी एक अपघात झाला आहे. दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचा चुराडा झाला. या अपघातामध्ये सचिन आडे यांचा मृत्यू झाला. पुणे-नगर महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोघांचा मृ्त्यू झाला. पोलिस या दोन्ही अपघातांचा तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें