घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुरंदरमध्ये शेवटच्या क्षणी काय घडलं?

पंचायत समिती निवडणुकीचा निकाल काल (सोमवारी) लागला. सभापती आणि उपसभापती निश्चित झाले आहेत. अनेक ठिकाणी बहुमताची समीकरणे जुळवण्यासाठी वेगवेगळ्या युती आघाड्या अस्तित्वात आल्या.या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्ष वेगवेगळे निवडणूक लढले असले तरी आता एकत्रित येत सत्ता स्थापन करताना पाहायला मिळाले.

पुणे जिल्हा परिषदेची स्थिती पाहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचंड असे बहुमत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतू पुणे जिल्ह्यातील अनेक पंचायत समितीमध्ये राजकीय पेच फसला होता. पुरंदर पंचायत समितीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाला स्पष्ट असं बहुमत मिळलं नव्हते. सर्वाधिक जागा या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या असून यांचे चार सदस्य निवडून आले आहेत.

तर भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रत्येकी दोन सदस्य विजयी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमतासाठी एका सदस्याच्या पाठिंबाची आवश्यकता होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतल्या नेमक्या कोणत्या पक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार याबाबत तालुक्यात प्रचंड उत्सुकता होती.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वातील भाजप सत्तेच्या वाटाघाटी करत होते. तर दुसरीकडे आमदार विजय शिवतारे यांच्या नेतृत्वातील शिवसेना राष्ट्रवादीसोबत युती करण्यासाठी आग्रही होती.

भाजप राष्ट्रवादीसोबत युतीच्या चर्चा करून उपसभापती पद आपल्या पदरात पाडून घेण्याच्या तयारीत असतानाच विजय शिवतारे यांनी एक राजकीय खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दर्शवला होता. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही खेळी त्यांनी खेळी होती.

त्यानंतर काल झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती तर उपसभापती पद हे शिवसेने आपल्या पदरात पाडून घेतले आहे. त्यामुळे भाजप नेते आणि माजी आमदार संजय जगताप यांच्यासह भाजपला मोठा धक्का शिवतारेंनी दिला असल्याचे बोलेले जाते.

पुरंदर पंचायतसमितीच्या निवडणुकीतील दिवे गणातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमित झेंडे यांची सभापतिपदी तर वीर गणातील शिवसेनेचे प्रवीण बाळासाहेब जगताप यांची उपसभापती म्हणून निवड झाली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें