घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

चोरलेल्या रिक्षातून प्रवासी वाहतूक; सराइताकडून सहा रिक्षा जप्त

चोरलेल्या रिक्षातून सराइताने प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय केला. रिक्षा चोरी केल्यानंतर भंगारात काढलेल्या रिक्षांचे क्रमांक वापरुन तो प्रवसी वाहतूक करत होता. काळेपडळ पोलिसांनी सराइताला अटक केली असून, त्याच्याकडून दहा लाख ७८ हजार रुपयांच्या सहा रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.

शादाब युसुफ अन्सारी (वय २५, रा. महंमदवाडी रस्ता, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. अन्सारी याने वानवडी, काळेपडळ, चंदननगर, पिंपरीतील संत तुकरामनगर परिसरातून रिक्षा चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

हडपसर भागातील काळेपडळ परिसरात पोलीस कर्मचारी महादेव शिंदे हे गस्त घालत होते.त्या वेळी उंड्री परिसरात त्याने झाडाखाली रिक्षा लावली होती. अन्सारी याने तेथे लावलेली रिक्षा चोरीची असल्याची माहिती शिंदे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून अन्सारीला पकडले. त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने सहा रिक्षा चोरल्याची कबुली दिली.

त्याने चोरलेल्या रिक्षांना भंगारात काढलेल्या रिक्षाचे क्रमांक वाहन पाटीवर लावले होते. चोरलेल्या रिक्षाचा वापर करुन त्याने रिक्षा चालक म्हणून व्यवसाय केल्याची माहिती तपासात मिळाली.

परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक निरीक्षक अमित शेटे, अमोल फडतरे, महादेव शिंदे, लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, गिरीराज जगदाळे यांनी ही कामगिरी केली.

भंगार दुकानातून वाहन क्रमांकाच्या पाट्या खरेदीशादाब अन्सारीनने भंगार माल खरेदी करणाऱ्या दुकानात जाऊन तेथे जुन्या रिक्षांच्या क्रमांकाच्या पाट्या खरेदी केल्या. या पाट्या रंगरंगाेटी करुन पुन्हा वापरल्या. चोरलेल्या रिक्षांवर या पाट्यांचा वापर केला.

या रिक्षांचा वापर तो प्रवासी वाहतुकीसाठी करायचा. पंधरा ते वीस दिवस रिक्षा व्यवसाय केल्यानंतर तो रिक्षा रस्त्याच्या कडेला लावून ठेवायचा. रिक्षा लावल्यानंतर रिक्षाचे चाक काढून ठेवायचा. त्यानंतर पुन्हा चाक लावून तो प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षाचा वापर करायचा, असी माहिती पोलिसांनी दिली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें