घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ज्येष्ठाची दोन कोटींची फसवणूक

शेअर बाजार आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची दोन कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना २ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२६ दरम्यान ऑनलाईन माध्यमातून घडली.

या प्रकरणात एका तरुणाने आपल्या वडिलांच्या वतीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील केले होते. त्यांना १० ते १५ टक्के नफ्याचे आमिष दाखवून एका लिंकद्वारे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर वेगवेगळ्या शेअर्स आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली एकूण २ कोटी ९ लाख ३० हजार ५३७ रुपये विविध बँक खात्यात भरण्यास लावले. ॲपवर खोटा नफा दाखवून प्रत्यक्षात त्यांची फसवणूक करण्यात आली.

सायबर पोलीस तपास करत आहेत.व्हॉट्सअप ग्रुपद्वारे ट्रेडिंगचे आमिष दाखवून ३० लाखांचा गंडाजादा नफ्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करायला लावून त्यांची ३० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २३ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत चिखली येथील राजे शिवाजी नगर येथे घडली.

या प्रकरणात एका व्यक्तीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका महिला आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले होते. तेथील महिला ॲडमीनने त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना एक ट्रेडिंग ॲप इन्स्टॉल करण्यास सांगितले.

त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ३० लाख ५० हजार रुपये भरण्यास भाग पाडले. गुंतवलेले पैसे परत न देता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. चिखली पोलीस तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें