पुणे प्रतिनिधी
दिनांक १८/०१/२०२५ रोजी खंडणी विरोधी पथक–१, गुन्हे शाखा, पुणे शहर येथील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे व पोलीस अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार अमोल आवाड व मयूर भोकरे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आरोपी सागर गणेश सुतार (रा. वारजे, पुणे) याच्याकडे गावठी पिस्टल असून तो देशमुखनगर, शिवणे येथील मोकळ्या जागेत बसलेला आहे.
ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे यांनी सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक–१, गुन्हे शाखा, पुणे शहर, श्रीमती अश्विनी जगताप यांना कळवली. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार बातमीची खात्री करून तात्काळ कारवाई करण्यात आली.
त्यानुसार आरोपी सागर गणेश सुतार, वय २५ वर्षे, रा. सर्वे नं. ४४, दुर्गादेवी मंदिराशेजारी, गणपती माथा, वारजे, पुणे यास रोहन दांगट देशमुखनगर, इंगळे कॉर्नर, शिवणे, पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला—
- १ सिल्व्हर रंगाचे गावठी पिस्टल
- पिस्टलच्या मॅगझिनमध्ये ०४ जिवंत काडतुसे
एकूण मुद्देमाल किंमत : रु. ४०,८००/-
यानुसार आरोपीविरुद्ध उत्तमनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ०५/२०२६ अन्वये आर्म्स अॅक्ट कलम ३(२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपीविरुद्ध यापूर्वी वारजे माळवाडी, उत्तमनगर व सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न, चोरी तसेच आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उत्तमनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर करीत आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त–१, गुन्हे शाखा श्री. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक–१, गुन्हे शाखा, पुणे शहर, श्रीमती अश्विनी जगताप यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
सदर कारवाईमध्ये
सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगाव, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे तसेच पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण, बालारफी शेख, अमोल आवाड, मयूर भोकरे, दुर्योधन गुरव व नितीन कांबळे यांनी सहभाग घेतला.











