घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

थेऊर परिसरात ५३ किलो गांजासह आरोपीला अटक

गुन्हे शाखेच्या पथकाने अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कारवाई करत थेऊर परिसरातून एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडून ५३ किलो ग्रॅम गांजा, आलिशान मोटार आणि मोबाईल असा सुमारे ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्रीतम रवींद्र कुंजीर (वय ३२, रा. धुमाळ मळा, थेऊर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेऊर फाटा परिसरात एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या मोटारीमधून मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे अमली पदार्थ पथक-एकच्या पथकाकडून ११ मार्च रोजी पहाटे पाचच्या सुमारास थेऊर फाटा परिसरात संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी मोटारीमध्ये ५३ किलो गांजा आढळून आला.

पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक निरीक्षक अनिल सुरवसे, पोलिस अंमलदार विठ्ठल साळुंखे, संजय राजे आदींनी ही कारवाई केली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें