घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पश्चिम भागात विश्वासाचा नवा अध्याय – शिंदे कुटुंब राष्ट्रवादीच्या छावणीत”


आ. मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक पक्षप्रवेश
(पाचगणी प्रतिनिधी : प्रमोद रांजणे)
वाई, दि. २१ — राजकारणात पक्ष बदलतात पण काही प्रवेश इतिहास घडवतात. आज वाईच्या पश्चिम भागात असाच एक निर्णायक क्षण पाहायला मिळाला. जनतेच्या हृदयात स्थान मिळवलेले लोकनेते बापूसाहेब शिंदे, युवा नेतृत्वाचा चेहरा विकास शिंदे, प्रविण शिंदे आणि माजी उपसभापती अनिल जगताप यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत “यशवंत विचारांचा झेंडा” पुन्हा उंचावला.
मदत व पुनर्वसन मंत्री तथा आमदार मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश केवळ औपचारिक कार्यक्रम नव्हता — तो होता विश्वासाचा करार.


कार्यक्रमाला किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, प्रतापराव पवार, डॉ. मंगेश महांगडे, बाबूनाना शिर्के यांच्यासह मान्यवरांची गर्दी होती. परिसरात “नवा बदल येतोय” अशी चर्चा रंगली होती.
विकास शिंदे म्हणाले,
“आज राजकारण धर्माच्या आडून खेळले जाते. पण आम्ही यशवंत चव्हाणांच्या विचारांवर वाढलो आहोत. स्वार्थी राजकारणाला नकार देत राष्ट्रवादीची वाट स्वीकारली आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत हा विश्वास तुटू देणार नाही.”
आ. मकरंद पाटील म्हणाले,
“शिंदे कुटुंब म्हणजे समाजसेवेची परंपरा. जनतेसाठी झटणारे हात राष्ट्रवादीत आले म्हणजे पक्ष अधिक बळकट होईल. पश्चिम भागाचे भवितव्य आता नव्या गतीने पुढे जाईल.”
कार्यक्रमाच्या शेवटी शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेत “नवा प्रवास सुरू झाला” असा निर्धार व्यक्त केला

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें