क्विन्स रेसिडेन्सी व भारती विद्यापीठ परिसरातील ड्रेनेज कामास सुरुवात
पुणे | आंबेगाव बुद्रुक :
आंबेगाव बुद्रुक येथील क्विन्स रेसिडेन्सी जवळ तसेच भारती विद्यापीठ परिसरात, ऐश्वर्या श्रीजी हॉटेलसमोर ड्रेनेजची अवस्था अत्यंत खराब झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
याबाबत आज सकाळी ९ वाजता नागरिकांकडून तक्रार प्राप्त होताच, नगरसेविका सौ. प्रतिभाताई चोरघे यांनी तातडीने दखल घेत संबंधित विभागाला त्वरित काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार साडेनऊ वाजेपर्यंत ड्रेनेज दुरुस्तीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.
ड्रेनेजमुळे होणारी दुर्गंधी, पाणी साचणे व संभाव्य आरोग्य धोके लक्षात घेऊन हे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. नागरिकांच्या मागणीला वेळ न दवडता प्रतिसाद देत काम सुरू करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
“तक्रार आल्यानंतर तात्काळ कृती करणारे नेतृत्व मिळाले आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली.











