दाभाडी भागात गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येची दखल घेत नगरसेविका प्रतिभाताई रोहिदास बापू चोरघे यांनी संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा केली.
या चर्चेनंतर सिंहगड कॉलेज, वडगाव येथील पाण्याच्या टाकीतून वडगाव–दाभाडी परिसराला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून १० फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण दाभाडी भागात पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
केवळ आश्वासनावर न थांबता या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी नगरसेविका प्रतिभाताई चोरघे स्वतः पाठपुरावा करीत असून, दाभाडीकरांना नियमित पाणी मिळेपर्यंत प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दाभाडीतील नागरिकांनी उपस्थित केलेल्या पाणी प्रश्नावर ठोस व दूरदृष्टी ठेवून उपाययोजना राबविल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.











