घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

‘महाराष्ट्र स्टेट बोर्ड २०२६ पेपर्स’, ग्रुप उघडून पुण्यात दहावी गणिताचा पेपर व्हायरल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेतील गणिताचा पेपर व्हायरल झाल्याप्रकरणी पोलिसांनी चंद्रपूर येथील एका युवकाला अटक केली आहे.

परीक्षा सुरू होण्यापूर्वीच मंगळवारी (दि. १०) गणित विषयाची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.याप्रकरणी राज्य मंडळातील अधीक्षक चंद्रकांत वैजनाथ जेवळीकर (रा. धनकवडी) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

त्यानुसार पोलिसांनी केलेल्या तपासात ही प्रश्नपत्रिका टेलिग्रामवरील एका अकाउंटवरून प्रसारित झाल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासात हे अकाऊंट चैतन्य विनोद शेंडे (वय १८, रा. चंद्रपूर) याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने चंद्रपूर येथे जाऊन शेंडे याला ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान आरोपीने टेलिग्राम प्लॅटफॉर्मचा वापर करून पेपर कसा व्हायरल केला, याबाबत माहिती दिली.

टेलिग्रामवर एकदा पीडीएफ फाइल अपलोड केल्यानंतर ती नंतरही बदलता येते आणि त्यावर ‘एडिट’ असा उल्लेख दिसतो, असे त्याने पोलिसांना सांगितले. शेंडे याने ‘महाराष्ट्र स्टेट बोर्ड २०२६ पेपर्स’ नावाने टेलिग्रामवर एक ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये त्याने कथित प्रश्नपत्रिका अपलोड करून त्या पाहण्यासाठी पासवर्ड ठेवला होता. प्रश्नपत्रिका हवी असल्यास ठराविक रक्कम पाठवावी, असा संदेश त्याने ग्रुपमध्ये प्रसारित केला होता.

प्राथमिक चौकशीत अनेक विद्यार्थ्यांकडून त्याने पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे. पैसे मिळाल्यानंतर संबंधितांना त्याने टेलिग्राम अकाउंटवरून ब्लॉक केल्याचेही तपासात उघड झाले आहे. शेंडे याला प्रश्नपत्रिका नेमकी कुठून मिळाली, तसेच त्याने एकूण किती जणांकडून पैसे उकळले, याबाबत सध्या पोलिसांकडून सखोल तपास सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें