घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांवर साधू-महंतांची तीव्र नाराजी

नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवरून साधू-महंतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कुंभमेळ्याची कामे चुकीच्या पद्धतीने आणि नियोजनशून्य सुरू असल्याचा गंभीर आरोप साधू समाजाकडून करण्यात आला आहे. प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे कुंभमेळ्याच्या पवित्रतेला आणि व्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे साधू-महंतांचे म्हणणे आहे.

साधू-महंतांनी स्पष्टपणे सांगितले की, सध्या कुंभमेळ्याच्या कामासाठी नेमण्यात आलेले अनेक अधिकारी अनुभवहीन असून त्यांना कुंभमेळ्याच्या परंपरा, धार्मिक महत्त्व आणि व्यवस्थापनाचा कोणताही अनुभव नाही. अशा कर्तृत्वशून्य आणि अपात्र अधिकाऱ्यांना तात्काळ परत पाठवून, पूर्वी कुंभमेळ्यात काम केलेले अनुभवी अधिकारी नेमावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून साधू समाजाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. “कुंभमेळा हा केवळ प्रशासनाचा कार्यक्रम नसून तो कोट्यवधी भाविकांचा आणि साधू-संन्याशांचा धार्मिक महोत्सव आहे. साधू समाजाला विश्वासात न घेता निर्णय घेतले गेले, तर त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतील,” असा इशारा साधू-महंतांनी दिला.

दरम्यान, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरातील कुंभमेळ्याशी संबंधित कामांबाबत अनेक तक्रारी असल्याचेही साधूंनी सांगितले. रस्ते, घाट विकास, साधू निवास व्यवस्था, तसेच धार्मिक विधींसाठी आवश्यक असलेल्या सुविधा अद्याप समाधानकारक नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर त्र्यंबकेश्वर येथे प्रत्यक्ष येऊन सर्व साधू-महंतांशी चर्चा करावी, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि त्यांना सांत्वन द्यावे, अशी जोरदार मागणी साधू समाजाकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री हस्तक्षेप केल्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही, असा विश्वास साधू-महंतांनी व्यक्त केला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू-महंत आणि प्रशासन यांच्यात वाढत चाललेला तणाव लक्षात घेता, राज्य सरकार यावर काय भूमिका घेते याकडे भाविकांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें