पुण्यातील दौंड शहरात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामादरम्यान रोड रोलरखाली सापडून चार वर्षांच्या चिमुकल्या मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण दौंड शहर हादरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आर्यन जाधव असे चिमुकल्याचे नाव असून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना दौंड शहरातील जनता कॉलनी परिसरात, सेंट सेबिस्टियन हायस्कूलच्या मागील रस्त्यावर घडली.
रोडरोलरखाली चिमुकला सापडलामिळालेल्या
माहितीनुसार, दौंड भागातील या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे डांबरीकरण सुरू होते. आर्यन जाधव याची आई याच ठिकाणी मजूर म्हणून काम करत होती. काम सुरू असतानाच आर्यन हा रस्त्याजवळच खेळत असताना, भरधाव वेगाने मागे घेत असलेल्या रोड रोलरखाली तो सापडला. रोडरोलर चालकाचा वेग अत्यंत जास्त होता. लवकरात लवकर काम उरकण्याच्या नादात चालकाने आवश्यक ती खबरदारी न घेता रोलर फिरवला आणि क्षणात आर्यनचा जागीच चिरडून मृत्यू झाला. या घटनेनंतर रोडरोलर चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती आहे.












