घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कारली, दोडके, टोमॅटो, मिरची, शेवग्याच्या भावात घट

पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेने काही प्रमाणात वाढली होती. परिणामी मागणी कमी असल्याने कारली, दोडके, फ्लाॅवर, कोबी, टोमॅटो, मिरची, शेवगा, तोतापुरी कैरीच्या भावात १० ते २० टक्क्यांनी घट झाली तर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर होते.

गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी राज्यासह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतील आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची १५ टेम्पो, कर्नाटकातून कोबी पाच टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून शेवगा पाच टेम्पो, राजस्थानातून गाजर दोन टेम्पो, कर्नाटकातून घेवडा तीन टेम्पो तर पावटा दोन टेम्पो, कर्नाटक आणि गुजरातमधून भुईमूग शेंगा प्रत्येकी तीन टेम्पो, आंध्र, कर्नाटक व तमिळनाडूतून तोतापुरी कैरी आठ टेम्पो, मध्यप्रदेशातून लसणाची १० टेम्पो तर इंदूर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून बटाट्याची ३० टेम्पो आवक झाली.

स्थानिक भागातून सातारी आले ८०० गोणी, भेंडी सहा टेम्पो, गवार आठ टेम्पो, टोमॅटो १० हजार क्रेट, हिरवी मिरची तीन टेम्पो, काकडी आठ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, कोबी पाच टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, गाजर तीन टेम्पो, घेवडा तीन टेम्पो तर पावट्याची दोन टेम्पो आवक झाली, अशी माहिती ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे १० किलोंचे भाव :

कांदा : ९०-१२०, बटाटा : ५०-१२०, लसूण : ४००-१०००, आले सातारी : ३५०-५००, भेंडी : २५०-४००, गवार : ३००-७००, टोमॅटो : ८०-१२०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : ५००-५५०, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : १५०-२००, काकडी : १००- १२०, कारली : हिरवी : २००-२५०, पांढरी : १५०-२००, पापडी : २५०-३००, पडवळ : १५०-२००, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : ५०-८०, वांगी : १५०-३००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी : २५०-३००, जाड : १००-१५०, शेवगा : १००-३००, गाजर : २००-२५०, वालवर : २५०-३००, बीट : ८०-१००, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २००-५५०, भुईमूग शेंग : ७००-१०००, मटार : परराज्य : ४५०, स्थानिक : ५००-५५०, पावटा : ३५०-४००, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : ५००-६००, सुरण : १८०-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें