घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अशोक खरातचा धक्कादायक बनाव

भोंदू अशोक खरातच्या विरोधातील प्रकरणात आणखी एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. महिलांचे लैंगिक शोषण करण्याबरोबरच तो अनोळखी व्यक्तींना एकत्र आणून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळत असल्याचे उघड झाले आहे.या नव्या प्रकारामुळे खरातच्या कारवायांची व्याप्ती अधिकच व्यापक आणि गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका उद्योगपतीने वैयक्तिक समस्येवर मार्गदर्शन घेण्यासाठी खरातच्या कार्यालयाला भेट दिली होती. याच वेळी खरातने त्याची ओळख एका आमदाराच्या पुतणीशी करून दिली होती. दोघांनी एकमेकांशी ओळख वाढवावी, मैत्री करावी आणि जवळीक निर्माण करावी, असा सल्ला दिला.

तुम्ही जर एकमेकांशी मैत्री केली, तर निश्चितच तुमचे जीवन आनंदमय होईल, असे त्यांना सांगितले होते. त्याने त्यांना एकत्र आणले. पुढील काही महिन्यांत दोघांमध्ये संबंध दृढ झाले आणि ते रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मात्र, काही काळानंतर खरातने हस्तक्षेप करत त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण करण्यास सुरुवात केली.

संबंधित तरुणीला उद्योगपतीकडे आपण गर्भवती असल्याचे सांगण्यास भाग पाडण्यात आले. ही माहिती मिळताच उद्योगपतीने घाबरून खरातशी संपर्क साधला. त्यावेळी खरातने परिस्थिती गंभीर असल्याचे भासवत, ‘तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल’ असे सांगून प्रकरण मिटवण्यासाठी तब्बल २० कोटी रुपये देण्याचा सल्ला दिला होता. भीतीच्या वातावरणात अडकलेल्या उद्योगपतीकडून ही मोठी रक्कम उकळण्यात आल्याचे सांगितले जाते.

काही महिन्यांनंतर या दोघांची योगायोगाने पुन्हा भेट झाली असता संपूर्ण कट उघडकीस आला. तरुणीने आपण गर्भवती नव्हते आणि तसे सांगण्यास भाग पाडले गेले होते, असे स्पष्ट केले. या प्रकारातून भोंदू खरातने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दोघांची फसवणूक करत कोट्यवधी रुपये उकळल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे खरातच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशा प्रकारे आणखी किती जणांना जाळ्यात अडकवण्यात आले असावे, याबाबतही तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें