घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा उरुळी कांचनमधील दौरा नागरिकांच्या मुळावर

देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या दौऱ्यासाठी केलेल्या अतिशय कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे रविवारी (ता.22) पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गासह उरुळी कांचन आणि लोणी काळभोर (ता.हवेली) परिसरातील अंतर्गत रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले. या निर्णयाचा फटका मात्र थेट सर्वसामान्य नागरिक आणि हजारो विद्यार्थ्यांना बसला असून, प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमाचा स्थापना दिन सोहळा व “सिक्रेट्स ऑफ अवर हॅपिनेस” या पुस्तकाचे प्रकाशनासाठी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आले होते, तर त्याच वेळी लोणी काळभोर येथील एमआयटी शैक्षणिक संकुलात पोलीस भरतीची परीक्षा देण्यासाठी तब्बल 5 हजारांहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. या दोन्ही मोठ्या कार्यक्रमांचे नियोजन एकाच दिवशी आणि एकाच परिसरात केल्याने वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

रविवारी सकाळी दहापासूनच महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. परीक्षा संपल्यानंतर हजारो विद्यार्थी एकाच वेळी बाहेर पडल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली. बसस्थानकांवर विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती आणि अनेकांना जीव धोक्यात घालून बसच्या दरवाज्याला लटकून प्रवास करावा लागत होता. प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी कोणतीही पर्यायी वाहतूक व्यवस्था न केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या कारणास्तव उरुळी कांचन परिसरातील अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या घराजवळ पोहोचण्यासही अडचणी निर्माण झाल्या. अनेक ठिकाणी पोलिसांनी वाहनधारकांना “गाडी इथेच लावा आणि पायी जा” असे सांगितल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. महागडी वाहने रस्त्यावर सोडून जाण्याची भीती असल्याने अनेकजण तासनतास गाड्यांमध्येच अडकून बसले.

या संपूर्ण घटनेत पोलिस आणि प्रशासनाची नियोजन क्षमता पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून आले. एका बाजूला व्हीआयपींच्या सुरक्षेला प्राधान्य देताना दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले. व्हीआयपी संस्कृतीमुळे सामान्यांना का त्रास सहन करावा लागतो? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

प्रशासनाचा नियोजनात सपशेल अपयशउपराष्ट्रपतींचा दौरा आणि हजारो विद्यार्थ्यांची परीक्षा या दोन्ही गोष्टी पूर्वनियोजित असतानाही वाहतूक व्यवस्थेचे कोणतेही ठोस नियोजन करण्यात आले नव्हते. पर्यायी मार्ग, अतिरिक्त बससेवा किंवा टप्प्याटप्प्याने परीक्षा संपवण्यासारख्या उपाययोजना केल्या असत्या तर ही परिस्थिती सहज टाळता आली असती. मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रविवारी संपूर्ण परिसरात अराजकतेसारखी स्थिती निर्माण झाली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें