घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

खरातने पाळलेला २० फुटांचा नाग, इथेच सगळे राजकारणी फसले!

गेल्या चार दिवसांपूर्वी समोर आलेल्या नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या शेकडो महिलांसोबत केलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरून गेला आहे.धक्कादायक म्हणजे महाराष्ट्राचे अर्धे मंत्रिमंडळ स्वत:ला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात याच्याकडे भविष्य पाहण्यासाठी जाई. गेल्या काही वर्षांपासून अडल्या नडलेल्यांचे भविष्य पाहून त्यांना यशाचा मार्ग दाखविण्याचा दावा अशोक खरात करीत होता. मात्र २०२२ साली राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी सिन्नरच्या मिरगावात जाऊन पूजाविधी केल्यानंतर अशोख खरात याचे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले.

तेव्हापासून अशोक खरात याने मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर राज्यातील अनेक महत्त्वाचे नेते अशोक खरात याच्याकडे जाऊ लागले. प्रशासनातील बडे अधिकारी, पोलीस खात्यातील अधिकारी, उद्योजक, चित्रपट सृष्टीतील कलाकार आदी मान्यवरांचा खरातकडे राबता वाढू लागला. परंतु हे सगळे जण खरातच्या खोट्या आध्यात्मिक रूपाला कसे भुलले, असा प्रश्न राज्याला पडलेला असताना त्याच संदर्भातील धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप अससेल्या अशोक खरात याच्यावर बुधवारी रात्री नाशिक पोलिसांनी अटकेची कारवाई केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर विशेष पोलीस पथक अर्थात एसआयटीकडून गेल्या तीन दिवसांपासून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या पोलीस तपासात अशोक खरात याची गुन्हा करण्याची मोडस ऑपरेंडी अर्थात गुन्हा करण्याची पद्धती समोर आली आहे. तसेच त्याचे राजकीय नेत्यांबरोबरचे संबंध कसे मजबूत झाले, हे देखील हळूहळू समोर येऊ लागले आहे.

.खरातने पाळलेला २० फुटांचा नाग, इथेच सगळे राजकारणी फसले!

सिन्नरच्या मिरगावात महादेवाचे मंदिर बांधून भोंदूबाबा खरात प्रसिद्ध झाला. गेल्या अनेक वर्षांपासून तो ज्योतिष पाहायचे काम करायचा. कुणी मुलगा होत नाही म्हणून भोंदू अशोक खरात याच्याकडे यायचे. कुणी संसारातल्या अडचणी घेऊन यायचे, कुणाला राजकीय भविष्याची चिंता असायची तर कुणाला नोकरीत प्रमोशन हवे असायचे. अशा ना ना प्रकारच्या तक्रारी घेऊन भक्त मंडळी अशोक खरात याच्या दरबारात जमायचे. पौर्णिमा अमावस्येला खरात मोठी पूजा करीत असे. या दिवशी मात्र गर्भश्रीमंत भक्तांची मांदियाळी खरातच्या दरबारात जमत असे.

दोष निवारणासाठी देशात प्रसिद्ध, हेच अशोक खरातने हेरलं अन् सुरू झाला नागाचा धावा!

नाशिक शहर हे अनेक प्रकारच्या दोष निवारणासाठी देशात प्रसिद्ध आहे. कालसर्प दोष, नारायण नागबळी आणि इतर धार्मिक विधींसाठी देशातील सर्वात प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकचा उल्लेख केला जातो. हेच हेरून त्याने भक्तांना मूर्खात काढण्यासाठी सर्प पूजा घालण्याचे सुरू केले. एकदा का दरबारात भक्त मंडळी जमली की अशोक खरात हा ध्यानात मग्न व्हायचा. पुढची काही मिनिटे तंत्र-मंत्र म्हणून थेट नागराजाचा धावा तो करीत असते. काही वेळात २० फुटांचा नाग त्याच्या आजूबाजूला यायचा. अशोक खरात याच्या विशिष्ट बोलण्यानंतर नाग फणा काढून डोलत असे. समोर भला मोठा नाग पाहून भक्त मंडळींची बोबडी वळत असे. अनेक जण तर भीतीने कोमात जाण्याचे प्रसंग ओढावले, असे सूत्र सांगतात. हे सगळे पाहून अनेक गर्भश्रीमंत भक्तांना त्याच्याकडे दैवी शक्ती असल्याचा भास झाला. समोर पाहिलेले दृश्य भक्त मंडळी त्यांच्या जवळच्या लोकांना सांगत. महाराजांच्या दिव्य शक्तीचा अनुभव घेण्यासाठी आणि आयुष्यातल्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हीही एकदा बाबांकडे जाऊन या, असे ते एकमेकांना सांगत असत.

रिमोट कंट्रोल अशोक खरातच्या हातात, त्याच्या तालावर नाग डोलत होता…!

परंतु सध्या सुरू असलेल्या चौकशीत तो नागच खोटा असल्याचे कळते आहे. रिमोट कंट्रोलने नियंत्रित होणारा परदेशातून आणलेला नाग तो वापरत असे. रिमोट कंट्रोल खरातच्या हातात असे. त्यामुळे त्याच्या तालावर नाग नाचत असे. त्याच्या याच खोट्या कृतीला भुलून राजकीय नेते आणि अधिकारी त्याच्या नादाला लागले. राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचे भविष्य पाहणाऱ्या कॅप्टनचे भविष्य मात्र सध्या अंधारात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें