घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

वसंत मोरेंच्या आरोपांवर प्रशांत जगतापांचं मोठं वक्तव्य

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळालं, तर शिवसेना (शिंदे), शिवसेना (ठाकरे), मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही पराभवाला सामोरं जावं लागलं. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांचाही पराभव झाला. भाजपाचे उमेदवार व्यंकोजी खोपडे यांनी वसंत मोरे यांचा पराभव केला.

वसंत मोरेंच्या आरोपानंतर आता प्रशांत जगताप यांनी प्रत्युत्तर देत वसंत मोरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. वसंत मोरे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेते असल्याचा उल्लेख करत आम्ही वसंत मोरेंच्या विरोधात उमेदवार उभा केला नाही, असा खुलासा प्रशांत जगताप यांनी केला आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

प्रशांत जगताप काय म्हणाले?

वसंत मोरे यांच्या सारख्या एका आंतरराष्ट्रीय नेत्याने माझ्यावर टिप्पणी करावी एवढे वसंत मोरे मोठे नाहीत आणि मी देखील एवढा छोटा नाही. कारण वसंत मोरे आंतरराष्ट्रीय नेते आहेत, त्यांना ५ ते ६ लाख फॉलोअर्स आहेत. त्यांना २० हजार मते पडली आहेत आणि त्यांच्या मुलाचं डिपॉजिट जप्त झालं आहे. त्यामुळे त्यांच्या सारख्या नेत्याने माझ्यावर बोलावं? याबाबत त्यांनी आत्मचिंतन करावं”, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.“त्यांच्या प्रभागातील एका भाजपाच्या नवख्या कार्यकर्त्याने वसंत मोरे यांचा पराभव केला. मुळात ज्या दिवशी त्यांचा पराभव झाला त्या दिवशी मी त्यांच्याशी बोललो की भाजपाने मनी आणि मस्सल पॉवरचा वापर केला. मात्र, असं असताना वसंत मोरे यांनी आमच्यावर का आरोप केले माहिती नाही. मी असेल किंवा अरविंद शिंदे असतील किंवा कॉग्रेस पक्ष असेल. आम्ही वसंत मोरे यांच्या विरोधात उमेदवार उभा केलेला नाही”, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.

वसंत मोरेंनी प्रशांत जगतापांवर काय आरोप केले?

“मी आणि प्रशांत जगताप आणि अरविंद शिंदे आम्ही सातत्याने भांडत होतो, जर आपली आघाडी आहे, तुम्ही आणि आम्ही आघाडीमध्ये आहोत तर मग तुम्ही असं का करता? गरज नसताना उमेदवार दिले. एका ठिकाणी एक उमेदवार दिला, तरी देखील त्या ठिकाणी ३ आणि या ठिकाणी २ असे ५ उमेदवार तुम्ही माझ्याच प्रभागात का दिले? म्हणजे हे सगळं पूर्व-नियोजित होतं. महापालिका निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी यांनी (प्रशांत जगतापांनी) भाजपाबरोबर हातमिळवणी केली हा माझा आरोप आहे आणि हा माझा आरोप मी सिद्ध करून दाखवेन”, असं वसंत मोरे यांनी म्हटलं होतं.

पराभवानंतर वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर वसंत मोरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली होती. त्या पोस्टमधील शेवटच्या वाक्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं होतं. ‘परिणाम तर भोगावे लागतील ना’, असं वसंत मोरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. वसंत मोरेंनी म्हटलं होतं की, “चार वर्ष पुणे शहरात कोणतेही पद नसताना २०२२ ते २०२६ गरीब मायबाप जनतेचा आधार बनून होतो आणि आता तर २० हजार ८६७ पीडित, शोषित, प्रमानिक जनतेने आशीर्वाद दिला आहे, परिणाम तर भोगावे लागतील ना…”, असं वसंत मोरे यांनी म्हटलं होतं.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें