घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

चुकीच्या टोल फ्री नंबरवर संपर्क अन् १८ लाखांची फसवणूक

बँकेचा टोल फ्री नंबर शोधताना चुकीच्या नंबरवर संपर्क झाल्याने एका व्यक्तीची १८ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार सांगवीत घडला आहे. ही घटना जानेवारी मध्ये ऑनलाईन पद्धतीने घडली.

याबाबत एका व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अनोळखी मोबाईल क्रमांक धारक आणि बँक खाते धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे एटीएम कार्ड चालत नसल्याने त्यांनी बँकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्याकडून बँकेच्या क्रमांकाशी साधर्म्य असलेल्या आरोपींच्या नंबरवर संपर्क झाला. आरोपीने फिर्यादीला विश्वासात घेऊन व्हॉट्सॲपवरून ओटीपी मागवून घेतला. तुमचे एटीएम कार्ड घरी येईल असे सांगून आरोपीने फिर्यादीच्या खात्यातून १८ लाख ४५ हजार रुपये काढून घेतले.

बरेच दिवस झाले तरी त्यांचे एटीएम कार्ड घरी आले नाही. त्याबाबत त्यांनी बँकेकडे पाठपुरावा केला असता अशा प्रकारे त्यांचा बँकेशी कोणताही संपर्क झाला नसल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें