घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अशोक खरातसोबतचा व्हिडिओ समोर, बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया

महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू बाबा अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दररोज त्याची कसून चौकशी केली जात आहे. अनेक राजकीय नेते अशोक खरातच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

या यादीत आता प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांचे नावही समाविष्ट झाले आहे. भोंदू बाबा अशोक खरात आणि बच्चू कडू यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात खरात बच्चू कडू यांना, ‘मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची आहे, जेंव्हा तुम्ही BJP मध्ये मंत्री असाल तेंव्हा तुम्ही इथे या! असं म्हणत आहे. यावर आता बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

म्हणाले की, भोंदू बाबाचा आम्ही निषेध करतो, आम्हाला कार्यकर्त्यांनी महादेवाच्या मंदिरात नेलं त्या ठिकाणी ते भोंदू बाबा होते. त्यांनी त्या ठिकाणी माझा सत्कार केला, ते माझ्यापेक्षा मोठे असल्याने संस्कृती प्रमाणे मी त्यांच्या पाया पडलो. आम्हाला माहित असतं की हे महाराज कामाचा नाही, पण समाज मन जपण्यासाठी आम्ही जातो, मात्र आम्ही त्याचा निषेध करतो.

भाजपवर गंभीर आरोपपुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, त्या महाराजांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शहा गेले, एकनाथ शिंदे ,विखे पाटील तिथे गेले पण तुम्ही मी त्यांना विचारलं का? कोणत्या सीड्या बाहेर काढायच्या हे भाजपने ठरवलं आहे, इतर लोक गेले पण त्यांना विचार नाही बच्चू कडू गरीब आहे म्हणून तुम्ही विचारत आहे. बच्चू कडूंना बदनाम करण्याचा अजेंडा बीजेपी कार्यालयाकडून आला आहे.

पुढे बोलताना म्हणाले की, ‘त्या भोंदू बाबांनी जे सांगितलं त्यांचं पूर्ण विधान चुकीचं निघालं, मी त्यावेळेस उद्धव ठाकरें यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो. खरात सोबतची माझी भेट अचानक झाली, कार्यकर्त्यांसोबत मी गेलो, त्या ठिकाणी माझा सत्कार झाला ती माझी चूक नाही, पण ते व्हिडिओ काढून मला बदनाम करण्याचं काम भाजपची टीम करत आहे.

पुढे बच्चू कडू म्हणाले की, ‘आसाराम बापूच्या भेटीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा गेले, भाजपचे मोठे चार नेते आसाराम बापू सोबत नसताना सुद्धा आहे, मग त्यांचा राजीनामा घ्यावा लागणार नाही का? ते झाकून ठेवायचं आणि इतर लोकांचा राजीनामा घ्यायचा, कोणासोबत कोणाचा फोटो असला म्हणजे त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात टाकणं चुकीचं आहे. दरम्यान, यावेळी बच्चू कडू यांनी अशोक खरात यांना जे जे भाजपचे नेते भेटले त्यांचे फोटो दाखवले. यात गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें