घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यात मित्रानेच मागीतली मैत्रिणीकडे 20 लाखाची खंडणी

मैत्रीमध्ये वाद झाल्यानंतर मित्रानेच आपल्या मैत्रिणीला ब्लॅकमेल करत, 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. एवढेच नाही तर खंडणी दिली नाही तरुणीचे फोटो व्हायरल करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी, वारजे माळवाडी पोलिसांनी विजयसिंह संतोष गुंड (वय 30, रा. मडेवडगाव, ता. श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर) याला अटक केली आहे. याबाबत 24 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 25 डिसेंबर 2025 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडला आहे.

याबाबत बोलताना वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी सांगितले की, संशयीत आरोपी विजयसिंह संतोष गुंड आणि फिर्यादी तरुणी एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यात मैत्री आहे. परंतु, काही कारणातून त्यांच्यात वाद झाले होते. त्यामुळे संशयीत आरोपीने तरुणीचा पाठलाग करून तिच्याकडे 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

जर तरुणीने त्याला पैसे दिले नाही तर त्याच्यासोबत असलेले तरुणीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादी तरुणीला तिच्या इच्छेविरुद्ध हाताला धरून जवळ ओढले. तसेच गावातील ग्रुपवर तरुणीचे फोटो व्हायरल केले.

तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन संशयीत आरोपी गुंड याने केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, तरुणीने याबाबत पोलिसात तक्रार देताच, गुन्हा दाखल करून वारजे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें