घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कसबा पेठेत बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील मेट्रो स्टेशनच्या खालील रस्त्यावर अनेक जण चारचाकी, दुचाकी, रिक्षा, टेम्पो थेट रस्त्यावर लावून जातात तर काही जण चक्क चारचाकी लावून बिनधास्तपणे तासन्‌‍ तास थांबलेले दिसतात.मात्र, या ठिकाणी मागील काही महिन्यांपासून अनेक वाहनचालक आपली वाहने बिनधास्त मेट्रो स्टेशनखाली लावून जातात. त्यामुळे हा रस्ता अरुंद होऊन वाहतूक रहदारी मंदावते.

सकाळ व संध्याकाळी घाईच्या वेळीस कोंडी होत असल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे नक्की मेट्रो वाहतूक सुरळीत करण्यासाठी आहे की कोंडीत भर टाकण्यासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या असंख्य बसथांब्यावरून रोज हजारो नोकरदारवर्ग, शाळा, महाविद्यालय विद्यार्थी, नागरिक, महिला लहान मुले या बसथांब्यावरून प्रवास करत असतात. त्यामुळे या स्वयंघोषित वाहनतळामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें