घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कवी जगदीश : केशव–कौन्तेय — अंतर्मनाच्या युद्धाची गाथा

वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे

केशव – कौन्तेय केशव–कौन्तेय, ही जोडी अप्रतिम! मायेच्या जाळ्यातून बाहेर काढणारा केशवाचा तो दिव्य स्पर्श अवर्णनीय… रणांगणावर युद्धाला न घाबरणारा, पण मनातील संघर्षाला टाळणारा पार्थ, त्यालाच स्वतःची ओळख करून देणारा मुरारी! ही जोडगोळी आजही तंत्रज्ञानाच्या युगात तितकीच ठाम उभी आहे… जर सगळेच नात्यांच्या वात्सल्याने बांधले गेले असते, तर कौन्तेयाला या रणांगणावर उभे राहावे लागले नसते. मनातील करुणा जर शत्रूंपर्यंत पोहोचली असती, तर शस्त्र उचलण्याची वेळच आली नसती… मनातील वादळ शांत करण्यासाठी ज्ञानाचा वर्षाव केला केशवाने, कारण त्याला जागवायची होती पार्थातील सत्य-असत्याची ज्योत… हतबल पार्थ, केशवाची गाथा ऐकत होता, आणि मनातील सगळी जळमटे हळूहळू गळून पडत होती… “खरंच, जर प्रेमाचा ओलावा असता तर युद्धाचा डाव असा रंगला नसता…” हा बोध उशिरा का होईना, पण पार्थाला झाला… सांगणारा सत्य उलगडत होता, आणि ऐकणारा ममत्वाच्या बंधनांपासून दूर जात होता… कारण त्याला ओळख झाली होती भासाच्या मृगजळाची…! — कवी : जगदीश

Advertisements
Advertisements

2 thoughts on “कवी जगदीश : केशव–कौन्तेय — अंतर्मनाच्या युद्धाची गाथा”

  1. “An epic journey through the human mind! ‘Keshav Kountey’ is not just a poem; it’s a mirror to our own inner struggles. Brilliantly written, Jagdish Kamble sir!”

    Reply
  2. Excellent wording jagdish sir..
    We are so proud of you.
    Your dedication in the marathi literature is excellent. Wish you best luck for the future in the field of marathi literature and marathi poems..great Kavi jagdish..

    Reply

Leave a Comment

और पढ़ें