२५ जानेवारीपासून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहनपुणे, २७ जानेवारी २०२६ :पुणे वाहतूक पोलिसांच्या मार्केट यार्ड वाहतूक विभागाने नागरिकांसाठी महत्त्वाची वाहतूक सूचना जारी केली आहे. पुणे महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या खोदकामाच्या कामामुळे गंगाधाम ते शत्रुंजय रोडदरम्यानचा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.
वाहतूक पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आई माता मंदिर उतारावरील (गंगाधाम–शत्रुंजय रोड) श्रीजी चौक ते गगन विहार Y-जंक्शन हा रस्त्याचा भाग २५ जानेवारी २०२६ पासून काम पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे.या मार्गावरून रोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
🚦 पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे :
कोंढवा (कान्हा हॉटेल) येथून गंगाधाम चौकाकडे जाण्यासाठी :➡️ पासळकर चौक – बिबवेवाडी रोड➡️ किंवा पासळकर चौक – कोंढवा रोडगंगाधाम चौकातून कोंढवा (कान्हा हॉटेल)कडे जाण्यासाठी :➡️ गंगाधाम – लुल्लानगर चौक – कोंढवा मार्ग➡️ किंवा गंगाधाम – बिबवेवाडी मार्ग📢 विशेष सूचना :वाहतूक विभागाने परिसरातील नागरिक, गृहनिर्माण संस्था व सोसायट्यांना ही सूचना व्हॉट्सअॅप व सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि फक्त निर्धारित पर्यायी मार्गांचाच वापर करावा, असे सांगण्यात आले आहे.प्रशासनाने स्पष्ट केले आहे की नागरिकांचे सहकार्य लाभल्यास खोदकामाच्या काळात वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवणे शक्य होईल.












