घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

आनंद दरबारच्या प्रांगणात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

दत्तनगर येथील आनंद दरबार, कात्रज (पुणे) येथे सोमवार, २६ जानेवारी रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

सकाळी ठीक ८ वाजता ढोल-ताशांच्या गजरात ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. यावर्षीचे ध्वजारोहण किंग बॉक्सिंग गोल्ड मेडलिस्ट वेदांत सोनार, तिरंदाजी गोल्ड मेडलिस्ट टिशा संचेती आणि ॲबकस गोल्ड मेडलिस्ट विनय लुनावत यांच्या शुभहस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीतास मानवंदना दिली.

त्यानंतर श्री चक्रधर स्वामी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत, प्रेरणादायी भाषणे आणि विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून देशप्रेम, एकात्मता आणि संविधानाचे महत्त्व अधोरेखित झाले.

कार्यक्रमस्थळी सौ नूतन कुलकर्णी व सौ सविता बाबर साकारलेल्या आकर्षक रांगोळ्या, विद्यार्थी च्या लेझीमचे सादरीकरण तसेच ढोल-ताशांच्या गजरामुळे संपूर्ण आनंद दरबारचा परिसर देशभक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नानासाहेब बेलदरे, जनहित विकास मंचचे अध्यक्ष सुधीर कोंढरे, शिवशंभू प्रतिष्ठान जांभुळवाडीचे अध्यक्ष नितीन जांभळे, शिवांजली मित्र मंडळाचे अध्यक्ष अंकुश जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजू फरांदे तसेच श्री चक्रधर स्वामी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कोंढरे घोलप सर ठोकले सर आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संविधान, लोकशाही मूल्ये, राष्ट्रीय एकात्मता आणि युवकांनी देशउभारणीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले. आनंद दरबारच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवले जात असून अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीत देशभक्तीची भावना अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौरभ धोका यांनी अत्यंत नेटकेपणाने केले, तर उपस्थित मान्यवरांची ओळख अंकिता धोका यांनी करून दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आनंद दरबार दत्तनगरचे सर्व ट्रस्टी, सदस्य आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.या वेळी परिसरातील नागरिक, पालकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Advertisements
Advertisements

1 thought on “आनंद दरबारच्या प्रांगणात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा”

Leave a Comment

और पढ़ें