प्रजासत्ताक दिनानिमित्त नसरापूर येथे बँक ऑफ महाराष्ट्र आणि ‘व्हिजन इंडिया’तर्फे शासकीय योजनांची जनजागृतीनसरापूर, ता भोर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बँक ऑफ महाराष्ट्र, नसरापूर शाखेच्या अंतर्गत असलेल्या ‘व्हिजन इंडिया बीसी (BC) पॉइंट’ येथे सामाजिक बांधिलकी जपत जनजागृती उपक्रम राबवण्यात आला.
२६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांना केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या विमा आणि पेन्शन योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.यावेळी बीसी (BC) श्री. संतोष मांढरे यांच्या विशेष सहकार्याने ग्राहकांना खालील तीन मुख्य योजनांचे महत्त्व पटवून देण्यात आले.
प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (PMJJBY): अल्प दरात जीवन विम्याचे संरक्षण. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY): अपघाती विमा कवच. अटल पेन्शन योजना (APY): वृद्धापकाळातील आर्थिक नियोजनासाठी पेन्शन सुविधा आधी योजनाची माहिती देण्यात आली .
हा उपक्रम बँक अधिकारी श्री. ज्ञानेश्वर शिंदे, श्री. सिद्धेश रेडकर आणि श्री. सचिन कांगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाला. यावेळी ‘व्हिजन इंडिया’चे प्रतिनिधी श्री. मनोहर खुटवड यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले की, “शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.” त्यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनांमध्ये आपला सहभाग नोंदवून स्वतःचे आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्याचे आवाहन केले.
नसरापूर परिसरातील ग्राहकांनी आणि नागरिकांनी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला. अनेक नागरिकांनी घटनास्थळीच योजनांबद्दलच्या शंकांचे निरसन करून घेत नोंदणी प्रक्रियेबाबत माहिती घेतली. प्रजासत्ताक दिनी राबवलेल्या या विधायक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.













