घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात छात्रभारतीचा धडक मोर्चा

छात्रभारती विद्यार्थी संघटना व इतर समविचारी संघटनांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात धडक आंदोलन करण्यात आले. या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या मागण्या ठामपणे मांडल्या.आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत हे कोर्स ऐच्छिक करण्याची मागणी करण्यात आली. तसेच “कमवा आणि शिका” योजनेअंतर्गत मिळणारे मानधन ₹55 वरून ₹80 पर्यंत वाढवावे आणि कामाचे दिवस 21 वरून 30 करण्यात यावेत, अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली.याशिवाय विद्यापीठातील वाढत्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

मराठी भाषा भवनाचे रखडलेले बांधकाम तात्काळ पूर्ण करून ते विद्यार्थ्यांसाठी खुले करावे, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.विद्यार्थ्यांच्या या सर्व मागण्या कुलगुरू आणि कौन्सिल सदस्यांसमोर मांडण्यात आल्या. यावेळी कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

“कमवा आणि शिका” योजनेचे मानधन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील तसेच एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स संदर्भातील तक्रारींवर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठी भाषा भवनाचे कामही तातडीने सुरू करून पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली.

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी वाढत्या महागाईमुळे शिक्षणाचा खर्च वाढत असल्याची भावना व्यक्त केली. योग्य मोबदला न मिळाल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले.दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

या मोर्चात अनिकेत घुले (राज्याध्यक्ष), विशाल शिंदे (राज्य संघटक), तुकाराम डोईफोडे (राज्य उपाध्यक्ष), सौरव शिंपी (राज्य सदस्य), वैष्णवी कोळी (पुणे जिल्हा युवा संघटिका), पल्लवी पिंपळकर (पुणे जिल्हा सचिव), वैष्णवी शिंपी (पुणे जिल्हा सदस्य), क्रांती यादव, यश सोनुले, आकाश गवई, सानिका भुजबळ, ओमकार वाघमारे, उदय आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“लढेंगे… जितेंगे…” या घोषणांनी संपूर्ण विद्यापीठ परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ✊

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें