घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कास-परळी भागात रानगव्याचे दर्शन

परळी भागातील कुडेघर गावात आज (ता. ३१) सकाळी रानगवा (गवा) अचानक रस्त्यावर आल्याने नागरिकांसह वाहनचालकांची भंबेरी उडाली. काही काळ गव्याने रस्त्यावर व शेत परिसरात वावर केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.घटनेदरम्यान एक स्कूटीस्वार महिला गव्याला समोर पाहून क्षणभर गोंधळून गेली. पुढे जावे की मागे वळावे, या संभ्रमात तिने यू-टर्न घेतल्याचे पाहणाऱ्यांनी सांगितले.

सकाळच्या सुमारास काही शेतकऱ्यांना शेताजवळ मोठा गवा फिरताना दिसला. गवा हा अत्यंत बलवान आणि कधीकधी आक्रमक होऊ शकणारा वन्यप्राणी असल्याने गावकऱ्यांनी सुरक्षित अंतर राखत सावधगिरी बाळगली.

दरम्यान, गव्याने काही काळ परिसरात वावर करत वाहनांची व इतर हालचालींचा अंदाज घेतला आणि नंतर जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र, या घटनेमुळे कुडेघर परिसरात भीतीचे वातावरण कायम असून, वनविभागाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें