घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

तडीपार गुंडाची पुण्यात बाईक रॅली, परिसरात भीतीचे वातावरण

शहरात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडानेच पोलिसांच्या नाकावर टिच्चून बाईक रॅली काढत परिसरात दहशत निर्माण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

खराडी परिसरात रामनवमीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमादरम्यान आरोपी निखिल मधुकर कांबळे (वय 23, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) हा आपल्या समर्थकांसह मोठ्या आवाजात गाणी वाजवत दाखल झाला. “डॉन आहे मी, बाप आहे मी” आणि “रगेलच्या नादी लागू नका” असे डायलॉग देत त्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

विशेष म्हणजे, आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तरीही तो उघडपणे फिरताना दिसत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीचे काही साथीदारही मोक्का अंतर्गत गुन्ह्यांमध्ये फरार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिस प्रशासनाने तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें