घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

राजभवन (लोकभवन) रस्त्याच्या रुंदीकरणाला लवकरच गती; नगरसेवक सनी निम्हण यांची मागणी

पुणे – पाषाण–औंध परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वपूर्ण घडामोड झाली असून, राजभवन रोड (सद्य: लोकभवन रोड) या अत्यंत महत्त्वाच्या व्हीआयपी मार्गाच्या रुंदीकरणाबाबत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

आज मा. अतिरिक्त आयुक्त दिवटे साहेब यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळा ठरत असलेल्या पोलीस विभागाच्या तीन इमारतींचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. संबंधित परवानग्या उपलब्ध असूनही विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे काम प्रलंबित राहिल्याचे निदर्शनास आणून दिले.

यावर मा. अतिरिक्त आयुक्तांनी तातडीने दखल घेत, येणाऱ्या काही महिन्यांत पोलीस विभागाच्या सर्व संबंधित इमारतींचे स्थलांतर पूर्ण करून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येईल, असे ठाम आश्वासन दिले.राजभवन (लोकभवन) रस्ता हा पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना जोडणारा प्रमुख मार्ग असून, या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक तसेच व्हीआयपींची ये-जा होत असते.

त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे औंध–पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.तसेच, ब्रेमेन चौक ते औंध राजीव गांधी पूल दरम्यान प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पालाही यामुळे गती मिळणार असून, भविष्यात संपूर्ण परिसरातील वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे.

नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करत, काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असे नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें