घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अपघातात प्रसिद्ध कीर्तनकार मधुकर महाराजांचा जागीच मृत्यू

कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारावर काळाने घाला घातला.वारकरी परिषदेची बैठक आटोपून दुचाकीने आपल्या गावी बारूळ येथे जातं असलेल्या ह.भ.प मधुकर महाराज बारूळकर यांना एका भरधाव हायवा ट्रकने चिरडलं. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी नांदेड शहरातील सिडको परिसरात ही दुर्देवी घटना घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होतं आहे.

नांदेड शहरातील सिडको परिसरात झालेल्या दुचाकी आणि ट्रकच्या भीषण अपघातात प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प मधुकर महाराज बारूळकर याचा जागीच मृत्यू झाला आहे.एका भरधाव ट्रकनं कीर्तनकार मधुकर महाराज यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कीर्तनकार मधुकर महाराज यांच्या मृत्यूमुळे वारकरी संप्रादयात शोककाळा पसरली आहे.

ह.भ.प मधुकर महाराज बारूळकर हे कंधार तालुक्यातील बारूळ येथील राहणारे होते. मराठा सेवा संघाच्या संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष देखील होते.मागील अनेक वर्षापासून संघटनेत सक्रीय होते. कीर्तनाच्या माध्यमातून ते समाज प्रबोधन करून समजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करत.

मंगळवारी सिडको परिसरात आयोजित वारकरी परिषदेच्या बैठकीसाठी ते गेले होते. बैठक संपन्न झाल्यानंतर ह.भ.प मधुकर महाराज दुचाकीने परत बारूळ गावी जातं होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ते रुबी हॉटेल जवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

ट्रकखाली चिरडून ह.भ.प मधुकर महाराज यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. लग्न गर्दीचा फायदा घेत ट्रकचालक फरार झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.नांदेड शहरात जड वाहतुकीवर बंदी आहे. असे असताना शहरात जड वाहनाची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सिडको हडको भागात रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाची रेलचेल दिवसभर सुरूच असते.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें