घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कुकडी डावा कालवा दुर्घटना : ४० तासांच्या शोधानंतर शिंगोटे दांपत्याचे मृतदेह सापडले

येडगाव(ता.जुन्नर) येथील कुकडी डाव्या कालव्यात काळवाडी हद्दीत अक्षय शिंगोटे(वय २८) व प्राजक्ता शिंगोटे(वय २५) हे दांपत्य सोमवारी(ता.३०) सायंकाळी बेपत्ता झाले होते. आळेफाटा पोलीस,शिवनेरी रेस्क्यु टीम व स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु होते.कालव्याला पाणी जास्त असल्याने शोध घेणे अवघड जात होते.

उंब्रजचे सरपंच हिरामण शिंगोटे व काळवाडी गावचे सरपंच तुषार वामन यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन कालव्या मधील पाणी कमी करण्याची मागणी केली मात्र त्यांनी पाणी कमी करण्यास असमर्थथा दाखविली याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याकडूनही पत्र देण्यात आले होते.

ग्रामस्थ व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.ग्रामस्थांनी येडगाव धरण परिसरात मंगळवारी रात्री आंदोलन केल्यानंतर बुधवारी(ता.१) सकाळी अधिकाऱ्यांनी पाणी बंद केले व जुन्नर येथील शिवनेरी रेस्क्यू टीमच्या मदतीने शोध घेण्यात आला.

बुधवारी सकाळी ज्याठिकाणी हि घटना घडली त्या जागेपासून दीड किलोमिटर अंतरावर कालव्याच्या तळाला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ढिगाऱ्याजवळ प्रथम प्राजक्ता शिंगोटे यांचा मृतदेह आढळला त्या जागेच्या पुढे १०० मिटर अंतरावर अक्षय शिंगोटे यांचा मृतदेह सापडला.आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी घटनास्थळी पंचनामा केला.पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें